सातशे गुहांचं भीमबेटका...

डॉ. वि. श्री. वाकणकर यांनी १९५८ साली भीमबेटका गुहांचा शोध लावून इतिहासाची पुनर्मांडणी केली.
Bhimbetka
BhimbetkaSakal
Updated on

केतन पुरी

१९५८ या वर्षातील ही गोष्ट. भोपाळ ते इटारसी असा रेल्वे प्रवास करणाऱ्या एका पुरातत्त्वीय संशोधकाला एक अद्‍भुत ठिकाणाचा शोध लागला, ज्यामुळं देशाच्या इतिहासाला मोठी कलाटणी मिळाली. त्याचं झालं असं, की रेल्वेमधून प्रवास करत असताना त्यांना एका डोंगराची रांग दिसली. त्या रांगेमध्ये काही गुहासुद्धा असल्याचं त्यांना जाणवलं. आजूबाजूच्या लोकांकडं चौकशी केली असता, या ठिकाणी अनेक जंगली प्राणी आणि घनदाट जंगल आहे त्यामुळं सहसा त्या डोंगराकडं कुणी जात नाही असे समजलं. त्या संशोधकाला हा डोंगर खुणावू लागला. प्रवासादरम्यान पुढील स्थानक येताच ते गाडीमधून उतरले आणि तडक त्या डोंगराच्या दिशेने चालू लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com