
केतन पुरी
ketan.author@gmail.com
पुणे शहरापासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर असणारे भुलेश्वर मंदिर कित्येक वर्षांपासून असंख्य पर्यटक, अभ्यासक, संशोधक आणि भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्रात पूर्व मध्ययुगीन कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या अतिशय सुंदर मंदिरांपैकी एक म्हणून भुलेश्वरमधील शिवालय प्रसिद्ध आहे.