- उज्ज्वलकुमार, saptrang@esakal.com
बिहारमध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांची एकच धांदल उडाली असून, निवडणूक आयोगही तयारीला लागला आहे. त्यातच आयोगाने मतदारांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली असून, त्यानुसार नवीन यादी तयार करण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. या प्रक्रियेला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला असून, आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच बिहारचे वातावरण तापले आहे.