
पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारा चरित्रग्रंथ ‘अभिषेकी - पंडित जितेंद्र अभिषेकी : कला आणि जीवनप्रवास’ येत्या शुक्रवारी (दि. २०) प्रकाशित होत आहे. राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाचं लेखन ज्येष्ठ निवेदिका-स्तंभलेखक शैला मुकुंद यांनी केलं आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं त्यांच्याशी विनायक लिमये यांनी साधलेला संवाद...