
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
इवल्याशा बाळमुठीत आलेले चुरमुरे खाण्यात पार्थ अगदी रमून गेला होता.
त्याचंच बोरन्हाण चालू होतं. सुंदर रेशमी काळं झबलं, त्यावर लावलेले पांढरे मोती आणि तसेच पांढरेशुभ्र हलव्याचे दागिने आणि मुकुट. त्या दागिन्यांनी काळं झबलं खुलून दिसत होतं, की झबल्याच्या काळ्या रंगामुळे दागिन्यांची शोभा वाढली होती माहीत नाही; पण झबलं आणि दागिने या दोन्हींमुळे पार्थ फारच गोड दिसत होता. एका सुभाषितच्या दोन ओळीच मग आठवल्या-