
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
‘ब्लॅक मिरर’ मालिकेचा पहिला सीजन प्रदर्शित झाला त्याला आता चौदा वर्षे झाली आहेत. आपल्याला हव्या त्या क्रमात कुठलाही भाग काढून पाहण्याची मुभा देणाऱ्या या मालिकेचा सातवा सीजन अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. मालिकेची खासियत अशी, की तिचे लेखक हे भवतालात घडत असलेले बदल लक्षात घेऊन त्यातून सूचित होणारे भविष्य चितारणाऱ्या संकल्पना नि आशय फारच रोचकरीत्या रचतात.