
सुलभा तेरणीकर
बोलपटाला सुरुवात होऊन अवघी सात वर्षे झाली होती. १९३८ हे वर्ष. भारतीय चित्रपट उद्योगाचे रौप्यमहोत्सवी वर्ष. भारतीय चित्रपट उद्योग जागतिक सिनेनिर्मितीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. लाहोरचे अब्दुल रशीद कारदार, कोल्हापूरचे भालजी पेंढारकर, गुजरातहून आलेले मेहबूब खान, रामपूरचे सोहराब मोदी यांच्या स्वतंत्र निर्मितीची स्वप्ने मात्र आभाळाला पोहोचली होती... दुसऱ्या महायुद्धाच्या सावल्यांना जणू वाकुल्या दाखवीत होती...