
सुलभा तेरणीकर - saptrang@esakal.com
भारतीय चित्रपटाचा चित्ररथ नित्य नव्या साजशृंगाराने सजत होता. रोज एक नवी कहाणी उलगडत होती. गोष्टीवेल्हाळ भारतीय रसिकांना दोन डोळ्यांनी किती पाहू, किती ऐकू, किती सांगू असे झाले होते. वाडिया पिक्चर्सची ‘हंटरवाली’ पडद्यावर स्टंटस् ॲक्शन करीत होती. ‘रणजीत मुव्हिटोन’ची ‘गुणसुंदरी’ सर्वांची लाडकी झाली होती. आधुनिक सुसज्ज बॉम्बे टॉकीजची नायिका सर्वांना मोह घालीत होती. कलकत्त्याच्या न्यू थिएटर्सच्या नायिका शीत तलावात प्रतिबिंब न्याहाळीत होत्या. मधुर गीतांनी दिवस फुलले होते...