काही वेळाने ससूने आपल्या छोट्या मैत्रिणीच्या घराचं दार ठोठावलं. आतापर्यंत तर त्याला स्वतःविषयी पूर्ण विश्वास वाटत होता, पण जशी ती समोर आली, तसं त्याच्या तोंडून शब्दच फुटेना!
खरं तर, आधी तुम्हाला त्या दिवसाविषयी सांगायला हवं, ज्या दिवशी ससूने बाजारात जाताना एक छान मुलगी बघितली आणि बघितल्याक्षणी त्यानं ठरवलं की, हिच्याशी मैत्री करायलाच हवी. आता मैत्री करायची म्हणजे, तिला भेटायला हवं.