Book cinemascope
sakal
- जयदीप पाठकजी, Jaydeep.Pathakji@esakal.com
सिनेमा या तंत्राधिष्ठित कलेची स्वतःची अशी परिभाषा आहे. आपल्याकडे सिनेमाला चार घटका मनोरंजनाचे साधन असे जरी ‘लेबल’ लावले असले तरीही प्रत्यक्षात या कलेची व्याप्ती मोठी आहे. दिग्दर्शकाला अभिप्रेत असलेला सिनेमा एक डोळस चित्रपट रसिक म्हणून कसा पाहावा, याचे मार्गदर्शन सिनेमा‘स्कोप’ हे पुस्तक करते. चित्रपट अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी या पुस्तकात सिनेमाच्या विविध अंगांबद्दल विश्लेषण केले आहे. चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या तंत्राचेही विवेचन असून, त्यामागचा चित्रपटकर्त्याचा विचार काय असतो, याचीही निरीक्षणेही आहेत.