एक फेब्रुवारीला देशाचं अंदाजपत्रक सादर होते. या अंदाजपत्रकाने बऱ्याच घडामोडी होतात. उद्योग आणि व्यापारात याचे पडसाद उमटतातच, पण अनेक घरातल्या विविध बाबींवर परिणाम होतात. अशाच एका कुटुंबातला अंदाजपत्रकाच्या पार्श्वभूमीवरचा खुसखुशीत संवाद...
अहो, आपल्या दोन्ही बँक खात्यांमध्ये पैशांचा पार खडखडाट झालाय बरं का. जरा बघा ना,’ असं सौंनी म्हणताच श्रीयुत फिसकारले. ‘बघा, काय बघा? तुम्ही लोक वाटेल तसे खर्च करणार. मी बापडा बघत बसणार. मुळात एक साधं, छोटं बजेट करायला काय जातं तुम्हा लोकांचं?’