- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
व्याघ्र जीवशास्त्रज्ञ डॉ. रघुनंदन चुन्दावत यांनी बुंदेलखंड प्रदेशातील पन्ना राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या संवर्धनासाठी केलेले काम उल्लेखनीय आहे. त्यानंतर तेथील प्रशासनाने वाघांच्या घटत्या संख्येची घेतलेली दखल, त्यातून या उद्यानात वाढलेली वाघांची संख्या हे तेथील प्रशासनाचे यश आहे; मात्र केन-बेतवा नदी जोडणी प्रकल्पाने या साऱ्या प्रयत्नांवर पाणी फेरल्याचे चित्र आहे.
ख्यातनाम व्याघ्र जीवशास्त्रज्ञ डॉ. रघुनंदन चुन्दावत यांनी लिहिलेले ‘द राइझ ॲण्ड फॉल ऑफ द एमेराल्ड टायगर्स’ हे पुस्तक वाचताना २०२० साली झालेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीतील अनेक संस्मरणीय क्षण डोळ्यांपुढे दिसू लागले. पन्नातील शुष्क पानगळीचे जंगल, तेथील वन्यजीवांच्या विविध प्रजाती, विंध्य पर्वतरांगेतील डोंगर-कपारी आणि नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या केन नदीचा खळाळता प्रवाह हे सर्व न विसरण्यासारखंच आहे.