स्वप्नांचा पाठलाग करा!

Darshana-Pawar
Darshana-Pawar

बिजनेस वुमन - दर्शना पवार, संस्थापक, 'मोदकम'
आपण प्रत्येक जण स्वप्नांचा पाठलाग करत असतो, मात्र स्वप्नांना सत्यात आणणे प्रत्येकाला जमतेच असते नाही. दर्शना पवार-चौरे यांनी मात्र स्वप्न पाहिले आणि ते सत्यातही आणले. दर्शना यांनी ‘ई अँड टीसी’मध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. शिवाय जपानी भाषेचेदेखील शिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना अगदी सहज मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही दिवस नोकरी केली, मात्र स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न आणि ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यांना कुकीज करण्याचा छंद होता. सुरवातीला घरीच करत असलेल्या या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याची संधी त्यांना लवकरच चालून आली.

व्यवसाय करताना भांडवलाचा खूप मोठा प्रश्‍न प्रत्येकापुढे असतो. दर्शना यांना हाच प्रश्‍न भेडसावत होता. त्या म्हणाल्या, ‘‘स्वप्न पाहिले असेल आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमची धडपड सुरू असल्यास संधी कुठून, कशी चालून येईल सांगता येत नाही.’’ दर्शना यांच्या बाबतीत असेच झाले. ब्रिटानिया मारी गोल्ड स्टार्टअप स्पर्धेच्या माध्यमातून एक लाख जणींतून ४० जणींची निवड झाली व त्यात दर्शना यांचा नंबर लागला. त्यांना दहा लाखांचे बक्षीस मिळाले आणि भांडवलाचा प्रश्‍न सुटला. याच भांडवलातून त्यांनी ‘मोदकम’ नावाने कुकीजच्या व्यवसायाला सुरवात झाली.

दर्शना विविध प्रकारच्या २० कुकीज् तयार करतात. महाराष्ट्रामध्ये ‘मोदक’ आणि  ‘पुरणपोळी’ सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहेत. कुकीजच्या माध्यमातून यामध्ये काही करता येईल का, यावर त्यांनी अभ्यास सुरू केला आणि मग त्यातून त्यांनी ‘मोदक’ आणि ‘पुरणपोळी’ कुकीज तयार केली. त्या म्हणाल्या, ‘मी माझ्या ‘मोदक’ आणि ‘पुरणपोळी’ कुकीजचा पेटंट आता घेणार आहे. मी सुरू केलेल्या ‘मोदकम’चे ट्रेडमार्कदेखील घेतले आहे. मला हा कुकीजचा ब्रॅंड उदयास, नावारूपास आणायचा आहे.’

एक स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या भांडवलावर व्यवसाय सुरू केलेल्या दर्शना नव्याने उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना सांगतात, ‘‘स्वप्नांचा पाठलाग करत राहा. संधी कुठून कशी चालून येईल सांगता येत नाही.

आयुष्यात बऱ्याच संधी चालून येत असतात. त्याचबरोबर असेही क्षण येतात जे तुम्हाला निराश करतात. त्या क्षणांवर मात करून आपण यश ओढून आणायचे असते. प्रत्येकाने आपल्यातील कलेला वाव देत प्रयत्न करीतच राहिले पाहिजे...’’

(शब्दांकन - गौरव मुठे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com