Caste-based discrimination : जातिभेद का संपला नाही?

Social Justice : उच्च शिक्षण संस्थांमधील जातीय छळ, यूजीसीचे नवे दिशानिर्देशक आणि त्यावरून पेटलेला सामाजिक वाद; ७५ वर्षांनंतरही कायम असलेल्या भेदभावाच्या वास्तवावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे प्रियदर्शन यांचे परखड आणि अत्यंत संवेदनशील विश्लेषण.
Caste-based discrimination

Caste-based discrimination

esakal

Updated on

प्रियदर्शन - saptrang@esak

ती बद्दलची तेढ अर्थात एखाद्या जातीबद्दलचा राग किंवा मनात असणारी अढी, विविध प्रकारचे पूर्वग्रह आपल्या समाजात अतिशय खोलवर रुजलेले आहेत, मात्र याची कल्पना असूनही असे कधीच वाटले नव्हते, की आजच्या सुधारलेल्या व अत्यंत शहरी अशा भागात म्हणजे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या मोर्चात ‘ब्राह्मणवाद जिंदाबाद’ ही घोषणादेखील ऐकायला मिळेल. पण ही घोषणा दुर्दैवाने खूप जोरजोरात, मुठी हलवत दिली गेली. सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे या घोषणा मुली देत होत्या, ज्यांना या ब्राह्मणवादाने कमी छळलेले नाही. या घोषणेसोबत त्या मोर्चामध्ये दोन दोन घोषणा दिल्या गेल्या. त्या म्हणजे ‘देश के गद्दारों को, गोली मारो सालों को’, आणि ‘भारत माता की जय’ एकाच श्वासात ब्राह्मणवादाचा जयघोष करणे, विरोधकांना देशाचा गद्दार ठरवणे आणि भारतमातेच्या नावामागे लपणे हे सगळे जसे घडत होते म्हणजे तो सारा प्रकार आपला समाज कोणत्या दिशेने जात आहे किंवा कशा प्रकारे संवेदनहीनतेचा बळी ठरत आहे. प्रत्यक्षात उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय छळ आणि अन्याय दूर करण्यासाठी यूजीसीने जे दिशानिर्देशक जारी केले, त्यानंतर समाजातील जातीय मतभेदाच्या दऱ्या उघडपणे समोर आल्या आहेत, ज्यांना झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com