
सानेगुरुजी यांची १२५ वी जयंती येत्या ता. २४ डिसेंबर रोजी सर्वत्र साजरी होईल, त्याचबरोबर सानेगुरुजी शिक्षक झाल्याच्या घटनेलाही या वर्षी शंभर वर्षं पूर्ण झाली आहेत. गुरुजींना देवत्व न देता त्यांचं मोठेपण कशात आहे हे पाहणं आणि त्यांचं आजच्या स्थितीत काय औचित्य आहे हे ओळखणं हा खरा मुद्दा आहे. शिक्षकसमुदायासाठी सानेगुरुजी हे ‘रोल मॉडेल’ आहेत;