beauty eyessakal
सप्तरंग
सौंदर्याची उधळण
कोणत्याही गोष्टीच्या सौंदर्यावर भाळणे हा माझा धर्मच आहे. माझ्या डोळ्यांचा तो जन्मसिद्ध हक्क आहे.
- विश्वास वसेकर, saptrang@esakal.com
कोणत्याही गोष्टीच्या सौंदर्यावर भाळणे हा माझा धर्मच आहे. माझ्या डोळ्यांचा तो जन्मसिद्ध हक्क आहे. मी अशा संस्कृतीत जन्मलो, वाढलो जिथे देवालासुद्धा रंगावरून नावं आहेत. श्रीरंग, रंगनाथ, कृष्ण, नीळकंठ. निसर्गातली सगळी चित्रकला याचीच. ‘किती रंगविसी रंग । रंग भरले डोळ्यात । माझ्यासाठी शिरीरंग । रंग खेळे आभाळात ।।’ आभाळात अन् गोकुळात रंग खेळणारा हरी थोरच!