सावनीची नवी इनिंग 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 July 2019

सर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...

छोट्या पडद्यावर डान्स, गाण्यांच्या रिॲलिटी शोची सर्वाधिक चलती आहे. अशातच ‘झी युवा’ वाहिनी ‘युवा सिंगर एक नंबर’ हा रिॲलिटी शो घेऊन येत आहे. या शोच्या परीक्षकपदी काही दिवसांपूर्वीच अभिनेता वैभव मांगले असणार, हे घोषित झाले होते. आता वैभवबरोबरच शास्त्रीय गायिका सावनी शेंडेही या शोच्या परीक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. सावनीचा परीक्षक म्हणून हा पहिलाच रिॲलिटी शो आहे. ‘युवा सिंगर एक नंबर’ या रिॲलिटी शोमधून तरुण गायकांना पुढे येण्याची संधी दिली जाणार आहे. सावनीही तिच्या या नव्या इनिंगसाठी सज्ज झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: celebrity sawani shende maitrin supplement sakal pune today