सहकलाकाराच्या पलीकडचं सुंदर नातं!

Shahir-and-Riya
Shahir-and-Riya

जोडी पडद्यावरची... - शाहीर शेख आणि रिया शर्मा
अभिनेता शाहीर शेखनं आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, तर अभिनेत्री रिया शर्माही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे. आता हे दोघं ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्‍तें है प्यार के’ या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. दोघं ऑनस्क्रीन सहजरीत्या वावरतात, तसेच ऑफस्क्रीनही त्यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. या मालिकेपूर्वी शाहीर-रिया कधीच भेटले नव्हते. त्यांची ओळख झाली ती ‘ये रिश्‍ते है प्यार के’च्या सेटवर. रिया म्हणते, ‘मी शाहीरला या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदाच भेटले. पण, त्याच्याबरोबर काम करताना मला कधीच अवघडल्यासारखं वाटलं नाही. सहकलाकार म्हणून त्यानं मला उत्तम साथ दिली. मजा करत काम कसं करायचं, हे शाहीरकडून शिकण्यासारखं आहे. मी अजूनही त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत आहे.’

शाहीरही रियाचं तोंडभरून कौतुक करतो. रियाचं तिच्या कामाप्रती असणारं प्रेम शाहीरला आवडतं. शाहीर सांगतो, ‘आम्ही एकत्र काम करून खूप कमी कालावधी झाला आहे, तरीही आमचं ट्युनिंग फार चांगलं जमून आलं आहे. रिया तिच्या कामाशी खूपच प्रामाणिक आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याची, जाणून घेण्याची तिला आवड आहे. मेहनतीनं सगळं काही मिळतं, यावर ती विश्‍वास ठेवणारी आहे. तिच्या सकारात्मक विचारांमुळं सेटवरही काम करण्यास एक वेगळाच उत्साह येतो. शाहीर आणि रियाच्या मैत्रीला काही महिने झाले आहेत, तरीही त्यांच्या मैत्रीला खूप वर्षं झाली असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. मालिकेच्या निमित्तानं दोन प्रसिद्ध कलाकार एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये सहकलाकाराच्या पलीकडंही मैत्रीचं सुंदर नातं निर्माण झालं. रियाला शाहीरच्या अभिनयकौशल्याचं कौतुक आहे. ‘शाहीर उत्तम कलाकार तर आहेच; पण त्याचबरोबरीनं तो त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी जीव ओतून मेहनत करतो. तो स्वतः सकारात्मक विचार तर करतोच; पण त्याचबरोबर इतरांनाही तो सकारात्मक विचार करण्यास लावतो. आजवरचा माझा सगळ्यात बेस्ट सहकलाकार म्हणजे शाहीर,’ असं रिया सांगत होती. या मालिकेच्या नव्या ट्‌विस्टमध्ये शाहीर-रियाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री अधिक खुलताना दिसणार आहे. मालिकेच्या पुढच्या टप्प्यावर या दोघांच्या नात्याला नवं वळण मिळणार आहे. पण, हे सगळं चित्रीकरण करत असताना धमाल किस्सेही घडतात. शाहीर म्हणतो, ‘‘या मालिकेत गुजरातीमधील प्रसिद्ध कलाकार काम करत आहेत. त्यांच्या आणि आमच्यामध्ये एक जनरेशन गॅप आहे. चित्रीकरणादरम्यान अनेक किस्से घडतात. पण, त्यातूनच आम्ही शिकतो. अभिनयामधील बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com