
सुनील कोंडुसकर
saptrang@esakal.com
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला दुर्गम, डोंगराळ भौगोलिक स्थिती असलेल्या चंदगड तालुक्यातील लोकांची भाषा संलग्न अन्य तालुक्यांतील भाषेपेक्षा वेगळी आहे. या भाषेवरुन त्या माणसाचा प्रदेश सहजपणे कळतो; म्हणूनच ती ‘चंदगडी’ म्हणून ओळखली जाते. मुळातच चंदगड तालुका हा कोकण, गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर वसल्यामुळे चंदगडी बोलीभाषेवर या तीनही भाषांचा प्रभाव जाणवतो.