Chandra Bhattacharjee art journey : ‘जे मला भिडतं, तीच माझी भाषा बनते’

Contemporary Indian Painters and Art : होर्डिंग पेंटर ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार; चंद्रा भट्टाचार्जी यांचा बर्धामान ते कोलकाता असा संघर्षमयी प्रवास आणि त्यांच्या चित्रांतील संताळ संस्कृतीचा प्रभाव अधोरेखित करणारा हा विशेष लेख असून त्यांच्या कलेची वेगळी ओळख करून देतो.
Chandra Bhattacharjee art journey

Chandra Bhattacharjee art journey

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

पश्चिम बंगालमधील बर्धामान येथे जन्मलेले चंद्रा भट्टाचार्जी यांच्यातली कला आणि त्यांना मिळालेली लोकमान्यता प्रचंड संघर्षातून मिळाली आहे. कोणतीही आर्थिक स्थिरता नसताना वाढताना, जगणं हीच दररोजची झुंज होती आणि त्याच अनुभवाचा ठसा त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीवर उमटला.

चंद्रा भट्टाचार्जींसाठी चित्रकला ही निवड नव्हती. ती जगण्याची एक अवस्था होती. काळानुसार बदल झाला असेल, तर तो या वेळेचा नाही - तर त्या वेळेचा व्यक्त होण्यासाठी त्यांनी वापरलेल्या भाषेचा.

१९६१ मध्ये पश्चिम बंगालमधील बर्धामान येथे जन्मलेले चंद्रा अत्यंत कठीण परिस्थितीत वाढले. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला होता. सुटून आल्यावर त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि चंद्रा लहान असतानाच त्यांचे निधन झाले. मोठ्या कुटुंबात, जवळजवळ कोणतीही आर्थिक स्थिरता नसताना वाढताना, जगणं हीच दररोजची झुंज होती - आणि त्याच अनुभवाचा ठसा त्यांच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीवर उमटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com