टीव्हीवरचे बाल कलाकार म्हणजे बाल कामगारच ना! मांडा तुमचे मत

टीम ई-सकाळ
बुधवार, 12 जून 2019

मांडा तुमचे मत! इथे प्रतिक्रिया द्या किंवा ई-मेल करा webeditor@esakal इथे!

पहिलं चित्रं.. एक सात-आठ वर्षांचा मुलगा चहाच्या टपरीवर काम करतोय.. कप-बशा विसळणं.. 'ए बारक्‍या' म्हणून मारलेल्या हाकेला प्रतिसाद देणं.. मालक आणि ग्राहक दोघांच्याही शिव्या खाणं वगैरे कामं असतातच.. एवढं सगळं करून काही कवड्या हातात टेकवल्या जाणार.. रोजची भूक भागत आहे ना, यावरच सगळं लक्ष केंद्रीत.. मग बाकीचं भविष्य वगैरे पाहण्याचं त्राण राहणार कुठून? 

दुसरं चित्रं.. चकचकीत स्टेज आहे.. फ्लॅश लाईट्‌स आणि फोकस लाईट्‌समध्ये रात्ररात्रभर जागून एक मुलगा गाण्याची कला सादर करतोय.. शाळा सांभाळा.. अभ्यास सांभाळा.. टीव्हीवर 'रिऍलिटी शो'मध्ये चमकायचंय म्हणून ती मेहनतही घ्या.. नाव मोठं होतंय.. भरपूर चमकायलाही मिळतंय.. एवढ्याशा त्या खांद्यांवर प्रचंड ओझं पडलंय.. सगळं भविष्याची स्वप्नं पाहण्यात रंगून गेलेले असताना वर्तमानातलं त्यांचं मूलपण शोधणार कुठे? 

बाल कामगार या समस्येची व्याप्ती आपण खूप सोपी करून ठेवली आहे. बाहेर अंगमेहनत करणारा, त्याच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हातभार लावणारा तो बाल कामगार! आणि त्याच वयात टीव्हीवर चमकणारा, रिऍलिटी शो असो वा टीव्ही मालिका, त्यामध्ये मेहनत करणारा तो बाल कलाकार! 

हा फरक करणे योग्य आहे का? बाल कामगारांची व्यथा जाणून घेत असताना बाल कलाकारांवर आलेलं दडपण कोण मोजणार आणि त्यावर उपाय काय करणार? 

मांडा तुमचे मत! इथे प्रतिक्रिया द्या किंवा ई-मेल करा webeditor@esakal इथे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child Artist is like a Child Labour Give Your Opinion