Childhood Bicycle Memories : पहिल्या सायकलीसाठी केलेली प्रतीक्षा आणि अविस्मरणीय बालपण

First Bicycle Emotional Journey : भाड्याच्या सायकलींपासून स्वतःच्या सायकलपर्यंतचा प्रवास, मध्यमवर्गीय कुटुंबातील दिवाळी बोनसची प्रतीक्षा आणि बालपणीच्या सायकलवेड्या आठवणींना उजाळा देणारा हा भावनिक अनुभव.
Childhood Bicycle Memories

Childhood Bicycle Memories

esakal

Updated on

लेकीला सायकल विकत घ्यायची होती, म्हणून दुकानात गेलो – दुकान कसलं, मॉलच होता तो सायकलींचा! तिच्यापेक्षा मीच जास्त हरखून गेलो – किती वेगवेगळ्या सायकली होत्या तिथे! वेड लागायची वेळ आली. अनेक वर्षांनी सायकलच्या अद्भुत विश्वात प्रवेश झाला...

मी सायकल शिकलो ती भाड्याने घेतलेल्या सायकलींवर. त्याकाळी कल्याणमध्ये सायकली भाड्याने मिळण्याची दोन दुकानं होती. तिथे निळ्या किंवा लाल रंगाच्या उंचीनुसार सायकली मिळायच्या. मी शिकलो तेव्हा तासाला आठ आणे म्हणजे पन्नास पैसे असा दर होता, आणि नंतर तो वाढत एक किंवा दीड रुपया झाला असेल. पण लवकरच दुकानं बंद पडली, कारण प्रत्येकाच्या घरी आपापल्या सायकली येऊ लागल्या. ‘एकत्रितरीत्या वापरा’कडून ‘माझं, स्वतःचं असण्या’कडे होत असलेला हा मोठा ‘शिफ्ट’ होता.

आमच्या वर्गातल्या काही मुलांकडे स्वतःच्या सायकली आल्याचं पाहून मग मीही माझ्या बाबांकडे हट्ट केला. ती गरजही होती. माझी शाळा घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी चालतच जायचो. पण आठवीपासून माझे दोन क्लास रामबाग परिसरात होते. म्हणजे बऱ्यापैकी लांब. तिथे जायला रिक्षा करण्यापेक्षा एकदाच सायकल घेतली असती तर ती जास्त चांगली ‘इन्व्हेस्टमेंट’ ठरली असती. शिवाय मी फुटबॉल खेळायला, क्रिकेटच्या प्रॅक्टिसला आणि सुट्ट्यांमध्ये मित्रांबरोबर आधारवाडीमार्गे गांधारी पूल असं जायचो, तेव्हाही सायकल कामी आली असतीच. आणि मित्रांप्रमाणे स्वतःची सायकल ‘मिरवणं’ हवं होतंच!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com