Climate Change India : प्लास्टिक, प्रदूषण आणि वाढते तापमान; पर्यावरणाच्या संकटाची खरी चाहूल

Plastic Pollution : हवामान बदल, प्लास्टिक प्रदूषण आणि अनियंत्रित शहरीकरणामुळे वाढणारे तापमान ही केवळ पर्यावरणाची नव्हे, तर मानवी जीवनशैली आणि भविष्यातील अस्तित्वाची गंभीर चेतावणी ठरत आहे.
Climate Change India :

Climate Change India :

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

प्लॅस्टिक वापर कमी करणं, ते पुन्हा वापरणं, पाणी जपून वापरणं इत्यादी. आय नो, हे फार किरकोळ आहे, पण तरी... हे केलेच पाहिजे. संपूर्ण सिस्टीमच नवी झाल्याशिवाय ठोस काही होणार नाही. नाहीतर या मलमपट्ट्या आहेत नुसत्या. साधं लॉजिक प्लॅस्टिकबंदी घालायची, पण प्रॉडक्शन चालू ठेवायचं, हे काय आहे.

पावसाची रिपरिप सुरू होती. एका संथ लयीत तो पडत होता. पण तरी हवा अजूनही दमट होती, उकडत होतं. गारवा म्हणावा तसा नव्हता. मी माझ्या क्यूबिकलमध्ये चहा पीत समोरच्या स्क्रीनकडे पाहत बसलो होतो. तेवढ्यात मोबाइल व्हायब्रेट झाला. माझ्यापासून, दोन क्यूबिकल्स सोडून असलेल्या कलिगचा मेसेज होता.

ती - हाय, व्हॉट्सअप?

मी - काही नाही. चहा पितोय. कंटाळा आलाय, उकडतंय.

ती - हो ना. जुलै संपत आलाय यार. पण अजूनही धड असा पाऊस पडत नाहीये. पूर्वी पाऊस पडला की थंडगार व्हायचं पुणं. (ती बोलायलाच लागली.) पार गंडलंय क्लायमेट सगळं. या वर्षी उन्हाळ्यात ४३ डिग्रीपर्यंत गेलोय आपण!

मी - राइट. एसीशिवाय पर्याय नाही. कूलरचा फायदा नाही. मग विषमता अशी होईल – एसी असणारे आणि एसी नसणारे. खरं सांगू का – हे सगळे इशारे आहेत. आपण ते नीट पाहत नाहीयोत. बेसुमार काँक्रिटीकरण, झाडंतोडी, बेलगाम कम्झम्पशन... कशाला काही धरबंदच नाहीये राहिलेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com