

Small CC car market India
esakal
सध्याची बाजाराची स्थिती पाहता ग्राहकांचा कल मोठ्या एसयूव्ही आणि अधिक इंजिन क्षमतेच्या वाहनांकडे दिसतो. तरीही कंपन्या मध्यमश्रेणीच्या म्हणजे हजार ते दीड हजार सीसी गाड्यांच्या निर्मितीबाबत अधिक सजग राहताना दिसतात. याचाच एक भाग म्हणजे कॉम्पॅक्ट किंवा हॅचबॅक श्रेणीच्या मोटारीत आलिशान वाहनांनाही टक्कर देणारी आधुनिक फीचर्स मिळत आहेत. वाहतूक कोंडी, मर्यादित पार्किंग स्पेस, किफायतशीर बजेट आणि चांगले मायलेज या सर्व गोष्टींचा विचार करता ‘स्मार्ट आणि प्रॅक्टिकल’ मोटारीचा ट्रेंड ग्राहकांना आकर्षित करत आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी सर्वसामान्य कुटुंबांना दुचाकीवरून चारचाकीकडे आणण्यासाठी २००८ मध्ये परवडणारी नॅनो आणली आणि तिची इंजिन क्षमता ६२४ सीसी एवढीच ठेवली होती. परिणामी, तिची किंमत एक लाखापर्यंतच्या आसपास राहिली. तत्कालीन काळात अनेक कुटुंबे एकाच स्कूटरवर तीन ते चार जण प्रवास करताना दिसत होती आणि त्यामुळेच टाटांनी सर्वात स्वस्त, सुरक्षित, कुटुंबासाठी चारचाकी मोटार आणली आणि तिची जोरात चर्चा झाली.