दगडांच्या देशा : आत्मविश्‍वास हाच गुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gargoti Museum

दगडांच्या देशा : आत्मविश्‍वास हाच गुरू

लेखक : के. सी. पांडे, सिन्नर

कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार (Negative Thoughts) येऊ देऊ नका. नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास (Confidence) कमी होतो. कधी कधी तर असं होतं, की सर्व काही सुरळीत सुरू असताना असा एखादा प्रसंग घडतो, की तुमचं संपूर्ण आयुष्य हेलावून टाकतो. आपले अस्तित्वच संपले की काय, याची जाणीव किंवा मनात विचार येऊ लागतो. पण या वेळी उभारी घेण्याचा आत्मविश्वास कमी होऊ देता कामा नये. दुसरे म्हणजे माणूस ओळखण्याची कला अवगत झाली पाहिजे. (Confidence is the Guru Saptarang Marathi Article Nashik News)

आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वातील महत्त्वपूर्ण पैलू असतो. तो डळमळला, की पुढची सगळीच गणितं चुकतात. त्यामुळे आत्मविश्वास कमी होईल अशा गोष्टी करण टाळलं पाहिजे किंवा सवयी बदलल्या पाहिजेत. आपण अनेक कौशल्यांमध्ये निपुण आहोत म्हणजे इतरांपेक्षा वरचढ आहोत, अशीही अनेकांची गैरसमजूत असते. त्यामुळे अशा व्यक्ती लगेच हुरळून जातात. काही व्यक्ती ध्येयपूर्तीनं इतक्या झपाटलेल्या असतात, की प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ध्येयपूर्तीला वेग मिळतो. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार येऊ देऊ नका. नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो. आपण कितीही अडचणीत सापडलो तरी संकटाच्या वेळी एकट्याने काय करू शकतो, याचा विचार करा. सकारात्मकतेसह परिस्थिती समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. संपूर्ण आयुष्यात संघर्ष असतोच, या वाटचालीत अनेक अनुभव येतात. काही गोड असतात, तर काही कडू असतात. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग घडले, की अगदी काही वेळेस वाटले ती आता संपलं सार, पण ईश्वरभक्ती व त्याची कृपा व माझा आत्मविश्वास कुठेही मला संपूर्ण वाटचालीत कमी पडला नाही.

तत्कालीन लष्करप्रमुख एन. सी. वीज यांनी गारगोटी संग्रहालयाला भेट दिली, तो प्रसंग.

तत्कालीन लष्करप्रमुख एन. सी. वीज यांनी गारगोटी संग्रहालयाला भेट दिली, तो प्रसंग.

गेल्या वर्षी याच महिन्यात माझ्यासाठी दैवत असलेल्या माझ्या आईचे वृद्धापकाळाने झालेले निधन, हा प्रसंग मला हेलावून टाकणारा होता. दुःख, संकटात सावरून त्यातून उभं राहण्याची ऊर्जाही मला माझ्या आईकडूनच मिळाली होती. आईचे गायत्री परिवारातील योगदान अनन्यसाधारण... तिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध संस्थांतर्फे तिला अभिवादन करण्यात आले. व्यवसायातही असे काही प्रसंग घडले, पण त्यातून मी नकारात्मक बाब स्वीकारण्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन अवलंबला. त्यामुळे माझ्यातील उत्तरोत्तर सकारात्मक ऊर्जाही वाढतच गेली. आपण जर सकारात्मक असलो, तर आपल्याला त्याच प्रकारची लोक आयुष्यात आपल्या वाटचालीत बरोबर येतात. एक मात्र निश्चित आपला दृष्टिकोन जसा आहे, तशाच प्रकारची लोक आपल्याला भेटतात. त्यांच्या सहवासाने आपले जीवन सुखकर व आनंददायी होते. त्यांच्यातील सेवाभाव हा सर्वांना भावतो. माझी मुले कुलीन व धवल, हेही माझ्या आईच्या संस्कारावर माझ्या मार्गदर्शनाखाली व्यवसायात आल्यानंतर त्यांनीही माझा व्यवसाय दिवसेंदिवस जगभर वाढविला.

गायत्री परिवाराचे डॉ. प्रणव पांड्या यांनी सपत्नीक गारगोटी संग्रहालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना के. सी. पांडे यांच्या मातोश्री शांतीदेवी.

गायत्री परिवाराचे डॉ. प्रणव पांड्या यांनी सपत्नीक गारगोटी संग्रहालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना के. सी. पांडे यांच्या मातोश्री शांतीदेवी.

त्या दोघांची लग्न ज्या घरात झाली, ते माझे जगद्गुरु श्री रामानुजाचार्य स्वामी श्री पुरुषोत्तमआचार्यजी. हे संपूर्ण देशात सुप्रसिद्ध असलेल्या फरीदाबाद दिल्ली येथील सिद्धदाता आश्रम लक्ष्मीनारायण दिव्यधामचे प्रमुख आहेत. माझे दुसरे व्याही डॉ. भूषणकुमार उपाध्याय पोलिस महासंचालक (होमगार्ड) महाराष्ट्र राज्य यांच्याशी जेव्हापासून आमचा ऋणानुबंध जोडला गेला, या दोन्ही व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक ऊर्जा भरलेली आहे. देशात प्रदेशातील वाटचालीत अनेक व्यक्ती मला व्यवसायाच्या माध्यमातून भेटल्या. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे ‘नो युवर मॅन.’ माणसे ओळखण्याची कला मला सुरवातीपासूनच अवगत होती. त्यामुळे भेटलेल्या प्रत्येकाला ओळखून त्याच्यातील सद्गगुण घेत मी नेहमीच मला सकारात्मक ठेवत आलो आहे.

हेही वाचा: पंख सकारात्मतेचे : सण- उत्सवांमागील सकारात्मकता

स्टिलबाइट

स्टिलबाइट

स्टिलबाइट

रासायनिक संरचना : सोडियम कैल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट हाइड्रेट

लाभ : प्रेम-भक्ती शक्तिशाली वाहक आहे. परिस्थिती स्वीकारून यशस्वी मार्गक्रमण करण्याची क्षमता मानसिकदृष्ट्या वाढविते, यासाठी ही गारगोटी उपयुक्त आहे.

स्थळ : औरंगाबाद

हेही वाचा: सह्याद्रीचा माथा : उन्हाळ्याच्या सुट्या आणि बालसंस्कार शिबिरे

Web Title: Confidence Is The Guru Saptarang Marathi Article Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top