esakal | स्वास्थ्यनियोजनात सातत्य गरजेचे...
sakal

बोलून बातमी शोधा

स्वास्थ्यनियोजनात सातत्य गरजेचे...

"शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

स्वास्थ्यनियोजनात सातत्य गरजेचे...

sakal_logo
By
डॉ. राजीव शारंगपाणी

हेल्थ वर्क
स्वास्थ्यनियोजनात आहार आणि विश्रांती फारच महत्त्वाची आहे. आहारात काय खातो हे महत्त्वाचे आहेच, पण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण खातो त्याचे शरीरात रूपांतर होते. त्यामुळे समोर असलेला पदार्थाचे आपले शरीर होऊ द्यायचे की नाही, हे आपले आपण ठरवावे. मात्र, कोणत्याही कारणाने खाण्यातील आनंद घालवू नये. आहाराबाबतचे विचित्र सल्ले ऐकून वैतागत बसू नये. काहीही खाताना पूर्णपणे स्वादाकडे आणि चवीकडे लक्ष ठेवून, टीव्ही न पाहता खावे. विश्रांती ही व्यायामानंतर असते. इतर वेळी तुम्ही लोळता त्याला विश्रांती म्हणत नाहीत. विश्रांती घेताना अत्यंत सुखकारक वाटले पाहिजे आणि संपल्यावर अंगात उत्साह संचारला पाहिजे, तरच विश्रांती नीट झाली असे समजावे.

स्वास्थ्यनियोजन हे असे सदैव करावे लागते. त्यात सातत्य गरजेचे असते. स्वस्थ व्यक्ती, स्वस्थ कुटुंब आणि पर्यायाने स्वस्थ समाज ही काळाची गरज आहे. आज समाजातील व्यक्ती आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून एकमेकांना लुबाडण्यात गर्क झालेल्या दिसतात. कारण त्या व्यक्ती स्वस्थ नाहीत. त्यांना खरे तर आनंदी होण्याची इच्छा आहे, मात्र एकमेकांना लुबाडण्यात आपण सतत एकमेकांचे नुकसानच करतो, याचे त्यांना भान नाही. पैसे जमवले, प्रसिद्धी मिळवली की झाले, असे काहीतरी विचित्र अनुमान त्यांनी काढले आहे. कुणाला कसा साक्षात्कार होईल, हे आपण कसे ठरविणार? एखाद्या वाल्या कोळ्याचा वाल्मीकी होतोच की! त्यासाठी वेळ यावी लागते. म्हणतात ना, वसंतऋतू येतो आणि झाडे फुलतात. तो यायचा तेव्हाच येतो, पण प्रयत्न करण्यातील मजा घ्यायला काय हरकत आहे?

loading image