Luxury Convertible Cars : लक्झरी कन्व्हर्टेबल कार्स; स्टाइल आणि रोमांचकारी अनुभवाचे प्रतीक

Soft top vs Hardtop cars : कन्व्हर्टेबल कार ही केवळ गरजेची वस्तू नसून स्टाइल, रोमांच आणि लक्झरी जीवनशैलीचे प्रतीक आहे, जिचा इतिहास चढउतारांचा असला तरी प्रीमियम सेगमेंटमध्ये तिचे आकर्षण कायम आहे.
Luxury Convertible Cars

Luxury Convertible Cars

esakal

Updated on

हौसेला मोल नाही, असे म्हणतात. हौसेखातर महागड्या वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. अशावेळी कन्व्हर्टेबल मोटारीची खरेदी ही प्रामुख्याने गरजेतून नाही, तर छंद, आवडीतून होताना दिसते. कन्व्हर्टेबल कार म्हणजे खुल्या आकाशाखाली वाऱ्याचा आनंद देणारी एक वेगळीच मोटार संस्कृती. आज या मोटारी सुरक्षित, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि लक्झरी वैशिष्ट्ययुक्त आहेत; पण त्याचा इतिहास चढउताराचा राहिला आहे. किमतीचा विचार केल्यास संबंधित कंपन्यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, ढोबळमानाने कन्व्हर्टेबल मोटारीच्या किमती साधारणपणे पन्नास लाख रुपयांपासून सुरू होतात आणि त्याची कमाल किंमत सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत राहू शकते.

जगभरातील मोटारप्रेमींसाठी कन्व्हर्टेबल कार आकर्षणाचा विषय आहे. भारतात या श्रेणीतील मोटारी कमी दिसत असल्या, तरी लक्झरी सेगमेंटमध्ये त्यांची मागणी आहे. एकप्रकारे कन्व्हर्टेबल कार म्हणजे स्टाइल, रोमांचकारी अनुभव आणि आलिशान जीवनशैलीचे सुंदर मिश्रण. भविष्यात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अधिक आकर्षक आणि पर्यावरणपूरक कन्व्हर्टेबल मॉडेल्स जगभरातच नाही तर भारतातही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने कन्व्हर्टेबल मोटार बहुतांशवेळा हिंदी चित्रपटांतूनच दिसतात. जिंदगी ना मिलेगी दोबारा, धूम-२, बंटी और बबली या अलीकडच्या काळातील चित्रपटाबरोबरच अगदी जुन्या चित्रपटांचा उल्लेख केला, तर फिरोजखान यांच्या बहुतांश चित्रपटांत कन्व्हर्टेबल मोटार पाहावयास मिळाल्या. राजेश खन्ना यांनी दार्जिलिंगच्या घाटात शर्मिला टागोर यांना ‘मेरे सपनो की रानी’ म्हणत साद घातली, तर मोकळ्या जीपमधूनच. चित्रपटातील व्यक्तीरेखा श्रीमंत दिसावी या हेतूने कन्व्हर्टेबल मोटारीचा वापर केला गेला. प्रत्यक्षातही आलिशान जीवनशैलीचे प्रतीक असणाऱ्या कन्व्हर्टेबल मोटारी सरसकट दिसत नाहीत. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना खुल्या आणि निरभ्र आकाशाचे दर्शन घडविणाऱ्या मोटारीविषयी अप्रुप वाटणे स्वाभाविक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com