
जयेंद्र लोंढे
भारतामध्ये क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. क्रिकेट या खेळाच्या विश्वकरंडक आयोजनाचा मान भारताला अनेकदा मिळाला. विश्वकरंडक ही स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याची किमयाही करून दाखवली. अर्थात क्रिकेट या खेळामधून अमाप पैसा मिळत असल्यामुळे सोयी-सुविधांपासून व्यवस्थापनापर्यंत कोणत्याही बाबतीत काटकसर करण्याची गरजच पडत नाही. सर्व काही सुरळीत होते; मात्र अशी परिस्थिती इतर खेळांबाबत दिसून येत नाही. त्यामुळे आशियाई, राष्ट्रकुल व ऑलिंपिक यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजनासाठी पावले उचलण्याआधी परिस्थितीचा विचार करावा लागतो.