
अरविंद रेणापूरकर - arvind.renapurkar@esakal.com
साहिर लुधियानवी यांचे ‘एक रास्ता है जिंदगी...’ हे गीत गुणगुणत दाट झाडीतून आणि लहान रस्त्यावरून बाइक चालविणारा शशी कपूर पाहिला, की आपल्यालाही दूरवर सैर करावीशी वाटते. शहरातील गोंगाटापासून दूर; परंतु जवळच डोंगरदऱ्यांतून फेरफेटका करणारी मंडळी कमी नाहीत. काही जण चारचाकीतून तर काही जण स्वत:ची बाइक काढतात. त्यातही क्रुझर बाइक असेल तर वीकेंडची भट्टी जमलीच म्हणून समजा. आरामदायी आसन, रुंद हँडलबार, दणकट टायर आणि न थकविणारी बाईक असेल तर दुसऱ्या दिवशी कामावरही जाण्याचा शीण येत नाही.