श्रीक्षेत्र पंढरपूर ते श्रीक्षेत्र घुमान ही सायकल वारी महिनाभराचा प्रवास करून गुरुवारी (ता. १२) पंढरपूरमध्ये दाखल झाली. शांती, समता, बंधुता तसेच संतांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या या वारीला यंदा तीन वर्षं पूर्ण झाली आहेत. संत नामदेवमहाराजांच्या प्रेरणेनं निरनिराळ्या राज्यांतून जाणाऱ्या घुमानवारीतून आध्यात्मिक विचारांचा धागा जोडण्याचं कार्य होत आहे. या सायकलवारीच्या त्रि-वर्षपूर्तीनिमित्त घेतलेला आढावा...