esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

पंचांग 12 मार्च 2020 

गुरुवार : फाल्गुन कृ. 3, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तुला, सूर्योदय 6.47, सूर्यास्त 6.44, चंद्रोदय रा. 21.35, चंद्रास्त स. 8.52, भारतीय सौर फाल्गुन 22, शके 1941. 

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान 

मेष : उत्साहाने कार्यरत राहणार आहात. अनेकांशी सुसंवाद साधाल. वैवाहिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभेल. 

वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. मनोबल कमी राहील. अनावश्‍यक कामे करावी लागतील. 

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. चिकाटीने कार्यरत राहाल. काहींना विविध लाभ होतील. प्रवासाचे योग येणार. 

कर्क : उत्साहाने कार्यरत राहणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. सर्वत्र सामंजस्याची भूमिका राहील. 

सिंह : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. काहींना कामाचा ताण वाढणार आहे. 

कन्या : व्यवसायातील आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकणार आहात. 

तूळ : आजचा दिवस आपणाला अनेक बाबतींमध्ये अनुकूल आहे. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहणार आहे. 

वृश्‍चिक : काहींना नैराश्‍य जाणवणार आहे. आरोग्याच्या तक्रारी राहतील. एखाद्या बाबतीमध्ये मनस्ताप संभवतो. तडजोड करावी. 

धनू : अनेकांशी सुसंवाद साधाणार आहात. मात्र, मित्रमैत्रिणींबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायामध्ये धाडस नको. 

मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात सहभाग राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 

कुंभ : वरिष्ठांचे व नातेवाइकांचे सहकार्य लाभणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. 

मीन : मनाविरुद्ध घटना. आपले तेच खरे करण्याची वृत्ती राहील. वादविवाद नकोत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता.