esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचाग - 20 एप्रिल 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope

मंगळवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १२.१९, चंद्रास्त रात्री १.५४, दुर्गाष्मी, अशोक कलिका प्राशन सकाळी ६.५३ पर्यंत, भवानी देवी उत्पत्ती, अशोकाष्टमी, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४३.

आजचे राशिभविष्य आणि पंचाग - 20 एप्रिल 2021

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग - दिनांक 20 एप्रिल 2021

मंगळवार : चैत्र शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १२.१९, चंद्रास्त रात्री १.५४, दुर्गाष्मी, अशोक कलिका प्राशन सकाळी ६.५३ पर्यंत, भवानी देवी उत्पत्ती, अशोकाष्टमी, भारतीय सौर चैत्र ३० शके १९४३.

दिनविशेष

१८८९ : जर्मनीचा महत्त्वाकांक्षी हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलर याचा जन्म.

१९९४ : पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले विभागप्रमुख आणि प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ एस. के. जतकर यांचे निधन.

१९९९ : 'रुचिरा' या पाककृतींच्या पुस्तकाच्या रूपाने घराघरांत पोचलेल्या श्रीमती कमलाबाई कृष्णाजी ओगले यांचे निधन.

१९९९ : मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणाऱ्या पेशव्यांचे श्रद्धास्थान म्हणजेच पुण्यातील पर्वती. येथील श्रीदेवदेवेश्वर मंदिराच्या स्थापनेस अडीचशे वर्षे पूर्ण.

राशिभविष्य

मेष: मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.

मिथुन: व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क: दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ •शकाल.

तूळ : मनोबल उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

वृश्चिक रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : मनोबल कमी राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येण्याची शक्यता.

मकर उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.

कुंभ: खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना विरोधकांचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

loading image