esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 एप्रिल 2021

बोलून बातमी शोधा

rashibhavishya

पंचांग - २६ एप्रिल २०२१, सोमवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/ तूळ, चंद्रोदय सायंकाळी ६.१३, चंद्रास्त सकाळी ६.१५,

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 26 एप्रिल 2021
sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग - २६ एप्रिल २०२१, सोमवार : चैत्र शुद्ध १४, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी कन्या/ तूळ, चंद्रोदय सायंकाळी ६.१३, चंद्रास्त सकाळी ६.१५, सर्व देवांना दवणा वाहणे, हनुमान जयंतीचा उपवास, अन्वाधान, कुलधर्म, नृसिंह दोलोत्सव, दमनक चतुर्दशी, पौर्णिमा प्रारंभ दुपारी १२.४५, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४३.

दिनविशेष

२००० : आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे व तालुक्यांना मुंबई व पुण्यातील मुख्य नियंत्रण कक्षाशी स्वतंत्रपणे जोडणाऱ्या संपर्क यंत्रणेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यरत.

२००३ : भारतीय वृत्तपत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेखांकनांचे (ग्राफिक्स) प्रणेते कुलभूषण कुमार यांचे निधन. १९५० च्या दशकात सुरू केलेली रेखांकनाची सेवा केबीके या नावानेच ओळखली जाते.

२००५ : महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा स्त्रीशिक्षणाचा वारसा पुढे चालवणाऱ्यापैकी एक असलेल्या चंद्राताई कर्नाटकी यांचे शंभराव्या वर्षात पदार्पण. ज्या वेळी स्त्रियांना लिहा-वाचायला येत नव्हते त्या काळात चंद्राताईंनी संस्कृत व इंग्रजी या विषयात बी.ए. आणि वेदान्तशास्त्र या विषयात एम.ए. पदवी घेतली. १९५६ ते ६१ पर्यंत त्या शिक्षण उपसंचालिका होत्या.

राशिभविष्य

मेष: खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ: संततीचे प्रश्न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन: सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जिद्दीने कार्यरत राहाल. नवीन परिचय होतील.

कर्क: नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. आर्थिक सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या: आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींना अचानक घनलाभाची शक्यता आहे.

तूळ : प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक : व्यवहार विचारपूर्वक करावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

धनू : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मकर: काहींना गुरुकृपा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

कुंभ: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. जिद्दीने कार्यरत राहाल.

मीन: जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.