
पंचांग -
बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२.
पंचांग -
बुधवार - कार्तिक कृष्ण २, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.५२ सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सायंकाळी ७.३५, चंद्रास्त सकाळी ८.२२, भारतीय सौर मार्गशीर्ष ११ शके १९४२.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिनविशेष -
जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन (युनेस्को)
१९०५ - मराठी लेखक, कवी, पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म. त्यांचे ‘पिकली पाने’, ‘शिंपले आणि मोती’, ‘तुटलेले तारे’, ‘प्रकाशाची दारे’ इ. लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध झाले. भारत सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ या किताबाने गौरविले.
१९९९ - काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन (फेमा) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर.
२००४ - ईडन गार्डन्सवरील भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात अव्वल लेगस्पिनर अनिल कुंबळेने कपिलदेव यांच्या ४३४ कसोटी बळींच्या कामगिरीशी बरोबरी केली.
दिनमान -
मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाणवाढेल.
मिथुन : उत्साह, उमेद वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासात दक्षता घ्यावी.
सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
कन्या : शासकीय कामे पार पडतील. सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल.
तुळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : अचानक धनलाभाची शक्यता. प्रकृतीकडे लक्ष द्यावे.
धनु : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.
कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
मीन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द वाढेल.
Edited By - Prashant Patil