esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार - अधिक आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ७.२६, चंद्रास्त सकाळी ७.२५, भारतीय सौर ११ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 03 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - अधिक आश्विन कृष्ण २, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.२०, चंद्रोदय सायंकाळी ७.२६, चंद्रास्त सकाळी ७.२५, भारतीय सौर ११ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक वसतिस्थान दिन

१९०३ : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म. संन्यास घेण्यापूर्वीचे त्यांचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर. १९४७ मध्ये मुर्शिदाबाद येथे झालेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या पहिल्या खुल्या अधिवेशनात त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अंतिम लढ्यासाठी रणशिंग फुंकले आणि रझाकारांविरुद्धच्या लढ्याला तोंड लागले. त्यांचे दुसरे महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे भाषिक तत्त्वावर तत्कालीन हैदराबाद राज्याचे विभाजन. ही  मागणी १९५६ मध्ये मान्य झाली.
१९०७ :  गुजराती कवी व समीक्षक मनसुखलाल भगनलाल जव्हेरी यांचा जन्म. त्यांनी ‘शाकुंतल’ व ‘हॅम्लेट’चे गुजरातीत भाषांतर करून ‘मेघदूत’च्या धर्तीवर ‘चंद्रदूत’ काव्य लिहिले. ‘कुरुक्षेत्रविषयक’ या दीर्घ कविता लेखनामुळे त्यांना प्रसिद्धी लाभली. प्रौढ शैली , संस्कृतप्रचूर प्रासादिक रचना या गुणांमुळे त्यांना गांधीयुगातील कवींत उच्च स्थान प्राप्त झाले.
१९४७ : जर्मन पदार्थ वैज्ञानिक मॅक्‍स प्लॅंक यांचे निधन. पुंजवादाच्या सिद्धांतासाठी १९१८ मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त.
१९५२ : इंग्लंडद्वारे पहिली अणुचाचणी १९५२ मध्ये यशस्वीपणे घेण्यात आली.
१९६१ : मराठी साहित्य महामंडळाने मराठी शुद्धलेखनाचे नवे नियम मंजूर केले.
१९६६ : हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांचे संस्थापक संपादक अनंत अंतरकर यांचे निधन.
१९९० : दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व आणि पश्‍चिम असे तुकडे पडलेल्या जर्मनीचे एकीकरण.
१९९२ : पं.शरश्‍चंद्र आरोळकर आणि पं.रामराव नाईक या ज्येष्ठ गायकांना तानसेन सन्मान संयुक्तपणे जाहीर.
१९९२ : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार उपमंत्री व राज्य लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष बी.डी.देशमुख यांचे निधन.
२००० : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक विठ्ठल हरी ऊर्फ नानासाहेब तुळपुळे यांचे निधन.
२००४ : राज्य शिखर बॅंकेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे संचालक व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते प्रल्हादराव एकनाथराव पाटील यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आपली मते इतरांना पटवून द्याल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती आहे. तुमचे मते इतरांना पटवून द्याल. 
सिंह : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : कामात अडचणी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
तुळ : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. भागीदारीत यश मिळेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृश्‍चिक : मनोरंजनाकडे कल राहील. प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.
धनु : विरोधकांवर मात कराल. मुलामुलींसाठी खर्च करावा लागेल. प्रसिद्धी लाभेल.
मकर : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती. आरोग्य चांगले राहील. प्रतिष्ठेचे योग येतील.
कुंभ : जिद्दीने व चिकाटीने हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल.थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. 
मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कुटुंबासाठी खर्च होईल. उधारी वसूल होईल.

Edited By - Prashant Patil