esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - कार्तिक कृष्ण ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री ९.२४, चंद्रास्त सकाळी १०.०८, भारतीय सौर मार्गशीर्ष १३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 04 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - कार्तिक कृष्ण ४, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.५३ सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री ९.२४, चंद्रास्त सकाळी १०.०८, भारतीय सौर मार्गशीर्ष १३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९२४ - ‘भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून ओळखले जाणाऱ्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चे उद्‌घाटन.
१९४८ - भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक.
 १९८१ - प्रसिद्ध चित्रकार ज.द.गोंधळेकर यांचे निधन. मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे पहिले भारतीय डीन. त्यांनी लंडनच्या स्लेड स्कूलमध्ये ब्राँझ पदक मिळवून जी.डी.आर्टस ही पदवी प्राप्त केली.
२००० - आशियाई क्रीडा स्पर्धेच्या फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघातील सदस्य रामबहादूर छात्री यांचे निधन.
२००४ - विशेष सामाजिक कार्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना चौथा पावलोस मार ग्रेगोरिअस पुरस्कार जाहीर.  ज्येष्ठ विचारवंत डॉ. पावलोस मार ग्रेगोरिअस यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. 

दिनमान -
मेष :
कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्‍यता. मानसिक अस्वस्थता राहील.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. शुभ कार्यासाठी दिवस चांगला.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
कर्क : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दक्षता घ्यावी. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. लाभाचे प्रमाण वाढेल. मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
वृश्‍चिक : आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
धनु : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रातील निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवीन हितसंबंध जुळतील.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
मीन : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil

loading image