आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 04 सप्टेंबर

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद कृ.2, चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.22, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा. 8.18, चंद्रास्त स. 7.57, भारतीय सौर 13, शके 1942.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८२५ - काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी यांचा जन्म. ‘भारताचे पितामह’ हे बिरुद त्यांना लावण्यात येते.
१८९३ - भारतीय रसायनशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ, आय.आय.टी. खरगपूर या अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक ग्यानचंद्र घोष यांचा जन्म. 
१९६७ - जातीयता निर्मूलनासाठी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे, धाडसी संपादक, नाटिकाकार, जाहिरातशास्त्रातील तज्ज्ञ, समतानंद अनंत हरी गद्रे यांचे निधन. ‘मौज’ आणि ‘निर्भीड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. 
१९९७ - ख्यातनाम हिंदी साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.धर्मवीर भारती यांचे निधन. ते ‘अभ्युदय’ व ‘संगम’ या नियतकालिकांचे संपादक होते. ते २७ वर्षे ‘धर्मयुग’च्या संपादकपदी होते. 
१९९७ - एशियाटिक सोसायटीचे माजी सरचिटणीस व क्रीडावैद्यक शास्त्रातील नामवंत तज्ज्ञ डॉ. चंदन रॉयचौधरी यांचे कलकत्ता येथे निधन.
१९९९ - संपूर्ण देशी बनावटीच्या ‘नाग’ या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची बालासोर येथील चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
२००० - आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसविणारे प्रसिद्ध अभिनेते मुक्री यांचे निधन.
२००३  - वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना लालबहादूर शास्त्री पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष  :
वाहने चालवताना काळजी घ्यावी. कामाचा ताण व दगदग जाणवेल.उसनवारी वसूल होईल. 
वृषभ : तुमच्या नवीन परिचय होतील. संततिच्याबाबतीत एखादी चांगली घटना घडेल.
मिथुन : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
कर्क  : हाती घेतलेली कामे पूर्णत्वास न्याल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी. 
कन्या : मनोबल व उत्साह वाढेल. छोेटे प्रवास होतील.रखडलेली कामे मार्गी लागतील.
तुळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनोबल कमी राहील.
वृश्‍चिक  : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. गाठीभेटी होतील.
धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
मकर  : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com