esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
सोमवार - अधिक आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय रात्री ८.४०, चंद्रास्त सकाळी ९.२१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर १३ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
सोमवार - अधिक आश्विन कृष्ण ३, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१८, चंद्रोदय रात्री ८.४०, चंद्रास्त सकाळी ९.२१, संकष्ट चतुर्थी, भारतीय सौर १३ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक शिक्षकदिन ( युनेस्को)

१८९० : तत्त्वज्ञ किशोरीलाल घनश्‍यामलाल मशरुवाला यांचा जन्म. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ‘हरिजन’ चे संपादक होते.
१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‌घाटन. भारताच्या आधुनिकीकरणात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे आहे.
१९७४ : भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन. 
१९९२ : नामवंत राजनैतिक मुत्सद्दी बॅ. परशुराम भवानराव ऊर्फ अप्पासाहेब पंत यांचे निधन. इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांत त्यांनी राजदूत व उच्चायुक्त म्हणून काम केले. सरकारने त्यांना १९५५ मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविले.
१९९५ : ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान पुरस्कार’ जाहीर.
१९९७ : ज्येष्ठ संसदपटू ,‘फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन.
१९९८ : ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष  :
 वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. दैनंदिन महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. 
वृषभ : वाहने चालवताना दक्षता घ्यावी. अनावश्यक कामात वेळ खर्च होण्याची शक्यता आहे. 
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. 
कर्क  : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमचा प्रभाव राहील.
सिंह : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. 
कन्या : एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. 
तुळ : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. 
वृश्‍चिक  : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.  
धनु : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. 
मकर  : प्रॉपर्टीच्या संदर्भातील कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवास शक्यतो टाळावेत.  
कुंभ : नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. 
मीन : व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. 

Edited By - Prashant Patil