esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 06 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - भाद्रपद कृ.4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.45, चंद्रोदय रा.9.26, चंद्रास्त स. 9.33, भारतीय सौर 15, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 06 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - भाद्रपद कृ.4, चंद्रनक्षत्र अश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.45, चंद्रोदय रा.9.26, चंद्रास्त स. 9.33, भारतीय सौर 15, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०१ - मराठी रंगभूमीवरील अभिनेत्री कमलाबाई गोखले यांचा जन्म. त्यांचे चिरंजीव चंद्रकांत गोखले, नातू विक्रम गोखले अशा तीन पिढ्यांनी अभिनयाचे क्षेत्र गाजविले. ‘मृच्छकटिक’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘मूकनायक’ आदी संगीत नाटकांत भूमिका करून त्यांनी नाव मिळविले. तसेच ‘संशयकल्लोळ’, ‘पेशव्यांचा पेशवा’, ‘उःशाप’, ‘हॅम्लेट’ या नाटकांतून महत्त्वाच्या भूमिका केल्या.
१९६३ - कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा-संशोधक गोविंद पै यांचे निधन. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांचा त्यांनी व्यासंग केला. त्यांच्या संशोधनपर लेखांची संख्या १६० हून अधिक भरते.
१९६५ - पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी भारताविरुद्ध युद्ध पुकारले. त्यांची दिल्लीपर्यंत धडक मारण्याची ‘ऑपरेशन ग्रॅंड स्लॅम’ म्हणून योजना होती. मात्र, पॅटन रणगाडे आणि सेबरजेट विमाने असतानाही पाकिस्तानला भारताने सपाटून मार दिला.
१९७२ - हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील महर्षितुल्य कलाकार उस्ताद अल्लाउद्दिन खाँ यांचे निधन. सरोद, व्हायोलिन व अन्य अनेक वाद्ये ते तयारीने वाजवीत असत. त्यांनी हेमंत, हेमबिहाग, शोभावती, मदनमंजिरी इ. रागांची रचना केली. 
१९७९ - नामवंत क्रिकेटपटू व भारतीय संघाचे कसोटीतील पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन.
१९९३ - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान पुरस्कारा’साठी ज्येष्ठ मराठी कवी गोविंद विनायक ऊर्फ विंदा करंदीकर यांची निवड.
१९९७ - अमेरिकेतील ‘नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस’ या संस्थेतर्फे विख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची ‘नॅशनल हेरिटेज’ फेलोशिपसाठी निवड.
१९९८ - जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचे निधन. त्यांचे ‘समथिंग लाईफ ॲन ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक अनेकांना चित्रपटगाथेसारखे महत्त्वाचे वाटते.
२००० - आंतरराष्ट्रीय दूरध्वनी सेवा परकीय उद्योगांसाठी खुली करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्त व्यवहारविषयक समितीचा निर्णय.
२००० - सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ वृक्षमित्र व सागरेश्वर अभयारण्याचे शिल्पकार धोंडिराम महादेव मोहिते यांचे निधन.
२००० - अनेक सामाजिक संस्थांचा आधार असणारे कोल्हापूरचे दानशूर उद्योगपती शांताराम कृष्णाजीपंत वालावलकर यांचे निधन.
२००३ - रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरपदाची वाय. व्ही. रेड्डी यांनी सूत्रे स्वीकारली.

दिनमान -
मेष  :
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मिथुन : अनेकांशी सुसंवाद  साधाल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. 
कर्क  :  नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. 
सिंह : आत्मविश्‍वास व मनोबल वाढविणारी एखादी घटन घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : कामात अडचणी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. 
वृश्‍चिक  : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : मुलामुलींसाठी खर्च करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
मकर  : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. मित्रमैत्रिणींवर अवलंबून राहू नका.संततिसौख्य लाभेल. 
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कुटुंबासाठी खर्च होईल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil