esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०८ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - आषाढ कृ. ३, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रा.९.५७, चंद्रास्त स. ७.५४, भारतीय सौर १७, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०८ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - आषाढ कृ. ३, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रा.९.५७, चंद्रास्त स. ७.५४, भारतीय सौर १७, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९६ - मुख्य निवडणूक आयुक्तपदी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टी. एन. शेषन यांना ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.
१९९६ - अवकाश आयोगाचे सदस्य आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रो. यू. आर. राव यांना द्वैवार्षिक आंतरराष्ट्रीय ‘विक्रम साराभाई पुरस्कार’ जाहीर. हा पुरस्कार मिळविणारे श्री. राव हे पहिले भारतीय संशोधक आहेत.
१९९७ - बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजूरानी देवीने रौप्यपदक पटकाविले.
२००१ - तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांचे कोल्हापूर येथे निधन.

दिनमान -
मेष :
काहींना गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. 
वृषभ : आर्थिक कामे मागीं लागतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. 
मिथुन : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. 
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
सिंह : विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य चांगले राहील. 
कन्या : व्यवसायातील महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.आरोग्य चांगले राहील.
तूळ : जिद्द व चिकाटी वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लावू शकाल. 
वृश्‍चिक : मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नये. संततिसौख्य लाभेल. 
धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : भागीदारी व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.  
कुंभ : आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. काहींचा धार्मिक कार्याकडे कल राहील. 
मीन : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. थोरामोठ्यांचे अपेक्षित मार्गदर्शन लाभेल.