esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 ऑक्टोबर

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय रात्री ११.४४, चंद्रास्त दुपारी १२.३१, कालाष्टमी, भारतीय सौर १७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 09 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - अधिक आश्विन कृष्ण ७, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१५, चंद्रोदय रात्री ११.४४, चंद्रास्त दुपारी १२.३१, कालाष्टमी, भारतीय सौर १७ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक टपाल कार्यालयदिन 

१८७६ : बौद्ध धर्माचे जगप्रसिद्ध अभ्यासक धर्मानंद कोसंबी यांचा जन्म.
१८९२ : ‘लोकहितवादी’ नावाने समाजसुधारणाविषयी लेखन करणारे रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. १८४८ ते ५० याकाळात ‘प्रभाकर’ साप्ताहिकातून त्यांनी ‘शतपत्रा’चे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणाऱ्या रुढींवर त्यानी प्रहार केला. 
१८९३ : स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात व देशात नावलौकिक मिळालेल्या ‘प्रभात’ च्या संतपटाचे पटकथाकार व संवाद लेखक श्री. शिवराम श्रीपाद वाशीकर यांचा कोल्हापूर येथे जन्म. 
१९१४ : बालवाङ्‌मयकार जनक विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. मुलांसाठी ‘बालबोध’ हे मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया घातला. 
१९५५ : विख्यात हार्मोनिअमवादक, संगीतकार, अभिनेते व लेखक गोविंदराव टेंबे यांचे निधन.अयोध्येचा राजा, अग्निकंकण,मायामच्छिंद्र इ. त्यांचे गाजलेले चित्रपट.

दिनमान -
मेष :
महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येतील.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटीजाणवतील. 
मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
कर्क : काहींना नैराश्य जाणवेल. चिंता लागून राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सिंह : आर्थिक लाभ होतील. आशाआकांक्षा पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. 
तुळ : प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी. 
धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारीत यश मिळेल. मान व प्रतिष्ठा लाभेल.
मकर : प्रियजनांसाठी खर्च कराल. हाताखालील कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभेल. 
कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती. नवीन ओळखी होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती. 

Edited By - Prashant Patil