आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 09 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

पंचांग -
बुधवार - भाद्रपद कृ.7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय रा.11.21, चंद्रास्त दु. 12.02, भारतीय सौर 17, शके 1942.

पंचांग -
बुधवार - भाद्रपद कृ.7, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.42, चंद्रोदय रा.11.21, चंद्रास्त दु. 12.02, भारतीय सौर 17, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५० - आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे साहित्यिक भारतेंदू हरिश्‍चंद्र यांचा जन्म. सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय अशी विविध नाटके त्यांनी लिहिली. हिंदी गद्याला शुद्ध, शक्तिशाली बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १८५० ते १९०० हा काळ ‘भारतेंदू काळ’ म्हणून हिंदी साहित्यात ओळखला जातो.
१९११ - मराठीतील ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक, पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी प्रमुख रामचंद्र शंकर तथा रा. शं. वाळिंबे यांचा जन्म.
१९८५ - मूक-बधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉयने तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करून विक्रम केला.
१९९४ - लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे निधन.
१९९७ - युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे संस्थापक-अध्यक्ष आर. एस. भट यांचे निधन.
१९९९ - माँट्रियालमध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय वयोवर्धन संस्थेच्या जागतिक परिषदेत वयोवर्धन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
२००१ - व्हेनिस येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांच्या ‘मॉन्सून वेडिंग’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन लायन’ पुरस्कार मिळाला.

दिनमान -
मेष  :
व्यवसायात प्रगती होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होतील.
वृषभ : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढणारी एखादी घटना घडेल. 
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
कर्क  : सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आजचा दिवस चांगला आहे. 
सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. 
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 
तुळ : आजचा दिवस फारसा अनुकूल नाही. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्‍चिक : उत्साह वाढेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. 
धनु : वेळ, पैसा वाया जाण्याची शक्यता मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास सुखकर होतील.
मकर  : मुलामुलींच्या संदर्भातील अडचणी कमी करू शकाल. नवीन ओळखी होतील. 
कुंभ : सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 09th September 2020