esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 डिसेंबर

पंचांग -
गुरुवार : कार्तिक कृष्ण १०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.५७ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ३.१०, चंद्रास्त दुपारी २.३१, भारतीय सौर मार्गशीर्ष १९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : कार्तिक कृष्ण १०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.५७ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ३.१०, चंद्रास्त दुपारी २.३१, भारतीय सौर मार्गशीर्ष १९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
मानवी हक्क दिन

१९९३ : इंडियन केमिकल सोसायटीतर्फे असेंद्रीय रसायनशास्त्रांतर्गत दिला जाणारा ‘आचार्य डॉ. प्रियरंजन राय’ हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान पुणे विद्यापीठातील डॉ. सुभाष पाध्ये यांना प्रदान.
१९९८ : अर्थशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान. 
२००० : रक्तजनक स्तंभ पेशींची (हिमेटोपॉयेटिक स्टेम सेल) देशातील पहिली बॅंक पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात (एएफएमसी) सुरू . रक्ताचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, अस्थिमज्जेचे विकार आदींच्या रुग्णांना या बॅंकेचा लाभ होऊ शकणार आहे.

दिनमान -
मेष :
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.
मिथुन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लागतील.
कर्क : प्रवास सुखकर होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : उधारी, उसनवारी वसूल होईल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : तुमचे मते इतरांना पटवून द्याल. मनोबल वाढेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
धनु : आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम राहील.धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.
मकर : काहींना गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटीने कार्यरत रहाल.
कुंभ : प्रवासात काळजी घ्यावी. वादविवाद शक्‍यतो टाळावेत.
मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

Edited By - Prashant Patil

loading image