esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग-  मंगळवार : निज आश्विन कृष्ण १०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री २.२५, चंद्रास्त दुपारी २.३०, भारतीय सौर कार्तिक १९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग- 
मंगळवार : निज आश्विन कृष्ण १०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.३९, सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री २.२५, चंद्रास्त दुपारी २.३०, भारतीय सौर कार्तिक १९ शके १९४२.

दिनविशेष - 10 नोव्हेंबर
World Science Day for Peace & Development (Unesco)

1659 : शिवाजी महाराजांना जिवंत अथवा मृत पकडून आणण्याचा विडा उचलणारा विजापूरचा सरदार अफजलखान याचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.
1848 : अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक संस्थापक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म.
1880 : ब्रिटिश निसर्गशास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. त्यांनी प्राण्यांच्या वर्गीकरणासंबंधी मूलभूत संशोधन केले.
1904 : कथालेखिका आणि समीक्षक कुसुमावती आत्माराम देशपांडे यांचा जन्म. ग्वाल्हेर येथील 43 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. "दीपकळी', "मोळी', "दीपमाळ' आदि त्यांचे लघुकथासंग्रह प्रकाशित झाले. "पासंग' हा त्यांचा 1933 ते 61 या काळातील निवडक टीकालेखांचा व भाषणांचा संग्रह होय.
1938 : तुर्कस्तानातील पारंपरिक राजवट संपवून प्रजासत्ताक स्थापन करणारे व आधुनिकता आणणारे अध्यक्ष मुस्तफा केमाल पाशा यांचे निधन.
1941 : संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचे निधन.
1941 : प्राच्यविद्यापंडित गंगानाथ झा यांचे निधन. अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरूपद त्यांनी 1923-32 या काळात भूषविले.
1994 : ख्यातनाम व ज्येष्ठ कन्नड साहित्यिक कवी डॉ. के. व्ही. पुट्टप्पा यांचे निधन. "कुवेंपू' या नावाने प्रसिद्ध असलेल्या डॉ. पुटप्पा यांनी साहित्याच्या सर्व अंगांना स्पर्श करून भारतीय साहित्यात मोलाची भर घातली. रामायणावर आधारित "श्री रामायण दर्शनम' या कन्नड महाकाव्याने त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी केले. केंद्र सरकारने "पद्मभूषण' व "पद्मविभूषण' हे सन्मान प्रदान करून त्यांचा गौरव केला होता. कर्नाटक सरकारने "राष्ट्रकवी' किताबाने त्यांना गौरविले. 1988 मध्ये त्यांना "पंपापती' हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळाला. अनेक इंग्रजी कथा कवितांचे त्यांनी भाषांतर केले. त्यांनी अनेक विषयांवर कथा लिहिल्या, तसेच चौदा नाटके लिहिली. त्यांत रामायणातील शंबूक वधावरील "शुद्र तपस्वी' याप्रमाणेच पुराण कथांवरील नाटके होती.
1996 : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या भावमधुर गीतांची मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचे निधन. "सावळाच रंग तुझा', "घन नीळा लडिवाळा' , "अमृताहुनी गोड नाम तुझे', "हंसले मनी चांदणे', "लावते मी निरांजन' इं त्यांची गीते गाजली. केंद्र सरकारने त्यांना "पद्मश्री' किताबाने गौरविले. लता मंगेशकर पुरस्कार, गदिमा पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले.
1999 : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा "तानसेन पुरस्कार' ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.
2001 : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. आर. चिदंबरम यांची केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्ती.
2002 : सांगली जिल्ह्यातील देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रसिद्ध कवी गोपाळकृष्ण सदाशिव ऊर्फ गो. स. चरणकर यांचे निधन.
2003 : समाजवादी कार्यकर्त्या व लेखिका चंपाताई लिमये यांचे निधन.

आजचे दिनमान

मेष - थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ - सार्वजनिक क्षेत्रात तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील.
मिथुन - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.
कर्क - व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल.
सिंह - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
कन्या - खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
तुळ - संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्‍चिक - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
धनु - प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
मकर - अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कुंभ - आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. प्रवास सुखकर होतील.
मीन - काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता आहे.