
गुरुवार : पौष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ७.३२, चंद्रास्त सायंकाळी ६.१५, दर्श अमावस्या, मौनी अमावास्या (जैन), अन्वाधान, गुरू पूर्व दर्शन, सूर्योदय - ७.०५, सूर्यास्त ६.३२ भारतीय सौर माघ २१ शके १९४२.
गुरुवार : पौष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ७.३२, चंद्रास्त सायंकाळी ६.१५, दर्श अमावस्या, मौनी अमावास्या (जैन), अन्वाधान, गुरू पूर्व दर्शन, सूर्योदय - ७.०५, सूर्यास्त ६.३२ भारतीय सौर माघ २१ शके १९४२.
दिनविशेष
१८०० : छायाचित्रकलेचे निर्माते हेन्री फॉक्स तालबॉट यांचा जन्म. निगेटिव्हच्या वापराची प्रक्रिया त्यांनी प्रथम सुरू केली.
१८४७ : विजेचा दिवा, ग्रामोफोन वगैरे शोधांचे जनक थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म. कंदिलाच्या कारखान्यासाठी काम करताना त्यांनी विजेच्या दिव्याची कल्पना मांडली असता, ‘कंपनीच्या धोरणात बसत नाही, कंदिलातच सुधारणा करावी’ असे व्यवस्थापनाने त्यांना सुनावले होते.
१९४२ : प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक जमनालाल बजाज यांचे निधन.
१९७९ : पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान-निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले.
१९८० : नामवंत इतिहास संशोधक रोमेश्वर मुजुमदार यांचे निधन.
२००० : पृथ्वीचा सुधारित नकाशा तयार करण्यासाठी ‘एन्डेव्हर’ या अवकाश यानाचे केप कॅनव्हेराल येथून उड्डाण. या अवकाशयानातून मिनिटाला एक लाख चौरस किलोमीटर या वेगाने छायाचित्रे काढली जातात.
दिनमान
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
कर्क : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनू : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मकर : अपेक्षित सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मीन : आपला जनसंपर्क वाढेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
प्रा. रमणलाल शहा