esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.५८ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ४.१२, चंद्रास्त दुपारी ३.१४, उत्पत्ती एकादशी, भारतीय सौर मार्गशीर्ष २० शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : कार्तिक कृष्ण ११, चंद्रनक्षत्र चित्रा/स्वाती, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.५८ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय पहाटे ४.१२, चंद्रास्त दुपारी ३.१४, उत्पत्ती एकादशी, भारतीय सौर मार्गशीर्ष २० शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
International Mountain Day

१९२२ : भारतीय चित्रसृष्टीचा अनभिषिक्त अभिनयसम्राट  दिलीपकुमार यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव मोहंमद युसूफ पठाण. त्यांना १९९४ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९६९ : भारताचे बुद्धिबळपटू विश्‍वनाथन आनंद यांचा जन्म.  भारत सरकारने १९८५ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९८८ मध्ये पद्मश्री आणि २००१ मध्ये पद्मभूषण हा सन्मान प्रदान केला.
१९८७ : मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचे निधन.  त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. ‘निळासावळा’ आणि ‘रक्तचंदन’ या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.
१९९६ : ज्येष्ठ सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप जाहीर.

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ :  खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रियजनांसाठी खर्च कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मिथुन : संततिसंदर्भात एखादी समस्या निर्माण होवू शकेल. प्रवासाचे योग येतील.
कर्क :  प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह : आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
कन्या : जुनी येणी वसूल होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृश्‍चिक : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
मकर : नोकरीत बढतीची शक्‍यता. मानसन्मान लाभेल. वादविवाद शक्‍यतो टाळावेत.
कुंभ : महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. प्रवास सुखकर होतील.
मीन : अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. एखादी चिंता लागून राहील.

Edited By - Prashant Patil

loading image