esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ११ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - ज्येष्ठ कृ. ६ चंद्रनक्षत्र धनिष्ठा, कुंभ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.५६ चंद्रास्त स.११.०१  भारतीय सौर २१, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ११ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - ज्येष्ठ कृ. ६ चंद्रनक्षत्र धनिष्ठा, कुंभ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.५६ चंद्रास्त स.११.०१  भारतीय सौर २१, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष -
१९२४ - नामवंत इतिहास संशोधक व नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. गुणोत्कर्ष, तारामंडळ, चित्रवंचना, उग्रमंडल आणि देशकंटक ही त्यांनी लिहिलेली काही नाटके. 
१९५० - नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक, थोर स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचे निधन. ‘श्‍यामची आई’ हे अजरामर पुस्तक त्यांनी लिहिले.
१९८३ - भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्‍यामदास बिर्ला यांचे निधन.
१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत ‘सुखोई-३० के’ ही रशियन बनावटीची विमाने हवाई दलात दाखल.
१९९७ - प्रसिद्ध उर्दू कादंबरीकार शकील जमाली यांचे निधन. १९५२ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘फिरदौस’ ही पहिली कादंबरी लिहिली. 
१९९७ - इंग्लिश खाडी प्रथम पोहून जाणारे पहिले भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांचे निधन.
२००० - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनमान -
मेष : कला क्षेत्रामध्ये प्रगती होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. 
वृषभ : तडजोडीची व सामंजस्याची भूमिका राहील. चिकाटीने कार्यरत राहाल.
मिथुन : आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कर्क : दैनंदिन कामे विलंबाने होतील. प्रकृती अस्वस्थ राहील. आराम करण्याकडे कल राहील. 
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. चिकाटीने कार्यरत राहाल. खर्च कमी होतील. 
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्‍यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. 
तुळ : काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. 
वृश्‍चिक : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 
धनू : काहींना नवा मार्ग दिसेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुमचा उत्साह वाढेल. 
मकर : चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम असणार आहे. 
कुंभ : गेले दोन दिवस असणारे नैराश्‍य कमी राहील. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल. 
मीन : काळजी घ्यावी. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.