esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

4rashibhavishya_25_12_2018.jpg

सोमवारः अधिक आश्विन कृष्ण 10, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.12, चंद्रोदय रात्री 2.40, चंद्रास्त दुपारी 3.05, भारतीय सौर 20 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग-

सोमवारः अधिक आश्विन कृष्ण 10, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.12, चंद्रोदय रात्री 2.40, चंद्रास्त दुपारी 3.05, भारतीय सौर 20 शके 1942.

दिनमान- 

मेषः कौटुंबिक वादविवाद टाळावेत. गुंतवणुकीचे व्यवहार पुढे ढकलावेत.

वृषभः काहींना गुरुकृपा लाभेल. सहकार्याची अपेक्षा नको. कामानिमित्त प्रवास होतील. 

मिथुनः आर्थिक लाभ होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्कः मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग येतील

सिंहः आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्याः संततिसंदर्भात प्रश्न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील.

तूळः रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. 

वृश्चिकः महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 

धनूः महत्त्वाचे निर्णय टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत.

मकरः तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभः मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. 

मीनः आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.