
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२८, दर्श वेळा अमावास्या
मंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२८, दर्श वेळा अमावास्या, (अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२३), अन्वाधान, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४२.
दिनविशेष
१८६३ - भारतीय तत्त्वज्ञानाचा सर्व जगभर प्रसार करणारे थोर पुरुष स्वामी विवेकानंद यांचा कलकत्ता येथे जन्म झाला.
१९०२ - महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचा जन्म. अव्वल दर्जाची प्रतिभा, उच्च शब्दप्रभुत्व, सखोल सहृदयता आणि श्रेष्ठ प्रतीचे तत्त्वचिंतन या सर्व गुणांचा मधुर मिलाफ न्यायरत्न विनोद यांच्या ठिकाणी होता. १९५४ साली टोकियोला भरलेल्या विश्वशांती परिषदेमध्ये न्यायरत्नांना ‘विश्वशांती सचिव’ ही बहुमानाची पदवी मिळाली.
१९०६ - भारतीय संस्कृतिकोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी लेखक महादेवशास्त्री जोशी यांचा गोमंतकच्या सत्तरी विभागातील आंबेडे या गावी जन्म.
१९४४ - लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी यांचे निधन.
१९९७ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गंगूताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे पहिला ‘बाया कर्वे पुरस्कार’ प्रदान.
२००४ - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे निधन.
दिनमान
मेष : अपेक्षित असणाऱ्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कामात यश लाभेल.
वृषभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर ठसा उमटेल.
तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
मकर : वादविवाद टाळावेत. काहींना अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.
मीन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही.
प्रा. रमणलाल शहा