esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग- गुरुवार : निज आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय पहाटे ४.२६, चंद्रास्त दुपारी ३.५५, गुरुद्वादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस (सायंकाळी सवत्स गाईचे पूजन), भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-


गुरुवार : निज आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय पहाटे ४.२६, चंद्रास्त दुपारी ३.५५, गुरुद्वादशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस (सायंकाळी सवत्स गाईचे पूजन), भारतीय सौर कार्तिक २१ शके १९४२.

आजचे दिनमान


मेष - मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील.
वृषभ - प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
मिथुन - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवासाचे योग येतील.
कर्क - नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह - आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या - आरोग्य उत्तम राहील. आजचा दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे.
तुळ - मानसिक अस्वस्थता जाणवेल. वेळ व पैसा खर्च होण्याची शक्‍यता.
वृश्‍चिक - संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
धनु - नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.
मकर - काहींना गुरूकृपा लाभेल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.
कुंभ - प्रवास शक्‍यतो टाळावेत. वादविवादात सहभाग नको.
मीन - तुम्ही आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.


दिनविशेष - 12 नोव्हेंबर


राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन
1880 : सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक सेनापती बापट यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट.
1896 : जागतिक कीर्तीचे पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म.
1903 : गांधीवादी विचारवंत, कुशल पत्रकार आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म.
1904 : ज्येष्ठ समाजवादी नेते व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू एस. एम. जोशी यांचा जन्म.
1927 : कोकण किनाऱ्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या "तुकाराम' आणि "जयंती' या दोन बोटी समुद्रात बुडाल्या. "टायटॅनिक' जहाजाइतकीच ही दुर्घटना कोकणात गंभीर मानली जाते.
1946 : थोर भारतीय नेते व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पं. मदनमोहन मालवीय यांचे निधन.
1957 : रशियाने अंतराळात धाडलेल्या दुसऱ्या यानातील प्रवासी असलेल्या लायका कुत्रीचा मृत्यू. अंतराळात जाणारी लायका ही पहिली सजीव होती.
1959 - बहुजन समाजाच्या चळवळीतील नेते, स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव जेधे यांचे निधन.
1993 : "नाशक' या क्षेपणास्त्रनौकेचे मुंबई येथे जलावतरण. माझगाव गोदीत बांधण्यात आलेली ही तिसरी क्षेपणास्त्रनौका आहे.
1997 : वेदाध्ययन आणि त्याचा प्रसार यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेले आचारनिष्ठ घनपाठी वेदाचार्य विनायकभट्ट घैसास गुरुजी यांचे निधन.
1997 : प्रयोगशील रंगभूषाकार निवृत्ती दळवी यांचे निधन.
1998 : नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या लहान पल्ल्याच्या, जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या "त्रिशूल' क्षेपणास्त्राची कोची येथील "आयएनएस द्रोणाचार्य' या तळावर यशस्वी चाचणी.
1998 : परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाविना मायदेशी येण्याची सुविधा देणारी "पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन' (पीआयओ) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून जाहीर.
2000 : दर वर्षी 12 नोव्हेंबर हा राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा सरकारचा निर्णय. 53 वर्षांपूर्वी याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे दिल्ली आकाशवाणीवरून भाषण प्रसारित झाले होते.
2003 : पुणे विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ या तीन विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांना आशियाई मुक्त विद्यापीठ संघटनेचा (एशियन असोसिएशन ऑफ ओपन युनिव्हर्सिटीज) पुरस्कार बॅंकॉक येथे प्रदान.